प्रगणना

लघु पाटबंधारे योजनांची प्रगणना २०००-२००१

केंद्ग शासनाच्या जलसंसाधन मंत्रालयाच्या निर्देशान्नुसार दर पाच वर्षांन्नी लघु पाटबंधारे योजनांची प्रगणना देशातील सर्व राज्ये व केंद्गशासित प्रदेशात एकाचवेळी घेण्यात येते. कृषी सिंचनासाठी उपयोगीतेत असलेल्या ० ते २००० हेक्टर सिंचन क्षमतेच्या योजनांमुळे होणार्‍या सिंचन विषयक बाबींची माहिती प्रगणनेद्वारे संकलीत करण्यात येते. लघु पाटबंधारे योजनांची मुख्यतः विभागणी भूपृष्ठावरील पाण्याचा वापर करुन केलेल्या कृषी सिंचनाच्या योजना तसेच भूपृष्ठाखालील पाणी उपयोगात आणून करण्यात येणार्‍या कृषी सिंचनाच्या योजना अशा प्रकारात केली जाते, जनगणना केलेल्या प्रपत्रात घेण्यात येते. लघु पाटबंधारे योजनांमध्ये साध्या विहीरी, उथळ व खोल कूपनलिका, प्रवाही सिंचन योजना व उपसा सिंचन योजनांचा समावेश होतो.

केंद्ग शासनाच्या जलसंसाधन मंत्रालयाच्या अखत्यारीत प्रत्येक राज्यात लघु पाटबंधारे योजनांची प्रगणना व मुल्यमापन पाहणी करण्यासाठी सांख्यिकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जलसंधारण मंत्रालय हे राज्यासाठी समवय विभाग म्हणून काम करते. १०० टक्के केंद्ग पुरस्कृत असलेल्या Rationalization of Minor Irrigation Stastitics (R.M.I.S) या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य प्रगणनेसाठी केंद्ग शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येते.

भारतासारख्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये शेतीस अनन्यसाधारण महत्त्व आह. देशातील सर्वसाधारणपण ७० टक्के लोकसंख्या शेती आणि शेतीस पूरक असलेल्या व्यवसायांवर अवलंबून आहे. कृषी उत्पादनामध्चे सिंचनासाठी निश्चित स्वरुपाचा पाणी वापर केल्यास उत्पादनामध्ये भरीव वाढ होते, ही बाब कृषीक्षेत्रास पाणीपुरवठा योजनांमुळे झाल्याचे दिसून आले आहे. कृषी सिंचनामध्ये लघु पाटबंधारे योजनांमुळे सर्वसाधारणपणे ७० टक्के सिंचन या योजनांमुळे होते. तसेच या योजना कमी कालावधीत पूर्ण होतात. त्यासाठी अल्प प्रमाणात भांडवली गुंतवणूक करावी लागते. याशिवाय प्रकल्पामुळे विस्थापित होणाज्या जनतेचे पुनर्वसन करावे लागत नाही. भूपृष्ठावरील व भूपृष्ठाखालील पाणी मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर नियोजनपूर्वक तसेच काटकसरीने करण्यास शासनाकडून वेळोवेळी प्राधाय देण्यात आले आहे. प्रगणनेद्वारे लघु पाटबंधारे योजनांची सद्यःस्थितीची माहिती घेणे तसेच सिंचनस्थिती विषयक अहवाल तयार करणे यासाठी प्रगणनेचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो. प्रगणनेद्वारे उपलब्ध होणाऱ्या माहितीचा उपयोग पंचवार्षिक योजनांच्या नियोजनासाठी होतो.

लघु पाटबंधारे योजनांची तिसरी प्रगणना राज्यात २०००-०१ या संदर्भ वर्षासाठी पूर्ण करण्यात आली. या प्रगणनेद्वारे साध्या विहीरी, उथळ व खोल कूपनलिका, प्रवाही सिंचनाच्या योजना आणि उपसा सिंचन योजना याबाबतची माहिती गावनिहाय उपलब्ध झाली त्याबाबतचा जिल्हानिहाय थोडक्यात गोषवारा पुढीलप्रमाणे आहे.

लघु पाटबंधारे योजनांची जिल्हानिहाय सद्य:स्थिती दर्शविणारा तक्ता (२००१-०१)

अ. क्र. जिल्हा जनगणना निहाय गावांची संख्या सध्या विहीरी उथळ कूपनलिका खोल कूपनलिका प्रवाही सिंचन योजना उपसा सिंचन योजना एकूण
1 2 3 4 5 6 7 8 9
1 अहमदनगर 1596 152542 11131 3283 4244 2631 173813
2 अकोला 988 20366 225 188 13233 826 34838
3 अमरावती 2004 73161 137 571 414 414 74697
4 औरंगाबाद 1344 88291 1444 150 266 14 90165
5 बीड 1365 30914 489 1862 1134 678 35077
6 भंडारा 874 15977 58 37 554 278 16904
7 बुलढाणा 1445 64397 459 163 1183 582 66784
8 चंद्रपूर 1799 13415 141 44 1337 824 15761
9 धुळे 681 50806 677 3083 916 268 55750
10 गडचिरोली 1686 11165 142 45 5317 123 16792
11 गोंदिया 968 8865 246 15 676 237 10039
12 हिंगोली 715 20655 3253 322 31 1945 26206
13 जळगाव 1522 20655 1320 6511 186 61 26206
14 जालना 971 50361 163 118 30 14 50686
15 कोल्हापूर 1217 41179 2519 2347 203 22342 68590
16 लातूर 945 27944 1036 10419 1190 3795 44384
17 नागपूर 1940 63578 514 39 313 486 64930
18 नांदेड 1625 28243 6872 1321 250 7895 44581
19 नंदुरबार 947 17354 2525 7330 1578 887 29674
20 नाशिक 1933 168204 3465 4577 5270 2634 184150
21 उस्मानाबाद 736 42702 1302 10235 1297 3105 58641
22 परभणी 847 27545 2223 104 22 1921 31815
23 पुणे 1855 116670 3842 1442 9909 104 131967
24 रायगड 1932 4622 357 125 281 1071 6456
25 रत्नागिरी 1551 2757 6 0 1263 267 4293
26 सांगली 730 89591 5425 11728 3583 7494 117821
27 सातारा 1740 75483 1522 573 8296 6460 92334
28 सिंधदुर्ग 746 4874 18 3 666 2710 8271
29 सोलापूर 1155 131361 4889 9966 47 21130 167393
30 ठाणे 1761 6148 2011 19 179 1171 9528
31 वर्धा 1389 43978 110 104 318 288 44798
32 वाशीम 790 19443 131 77 3421 1527 24599
33 यवतमाळ 2134 36517 768 422 94 5720 43521
  एकूण 43931 1658558 59420 77223 67701 99902 1962804